मित्रांनो, ट्रॅक्टर अनुदान योजना सुरू आहे. ट्रॅक्टरसाठी आपलं सरकार 50% अनुदान देत आहे आणि जास्तीत जास्त ₹1,25,000 रुपये हे ट्रॅक्टरसाठी अनुदान दिलं जातं. आता या ट्रॅक्टरसाठी ऑनलाईन अर्ज तुम्ही करू शकता. यामध्ये प्रथम जो अर्ज करेल त्याला इथे निवड केली जाईल, म्हणजेच प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य राहणार आहे.
तर चला मित्रांनो, तुम्ही तुमच्या मोबाईलमधून किंवा लॅपटॉप, पीसी मधून ऑनलाईन पद्धतीने कसा अर्ज करायचा ते पाहूयात. तर चला चला, व्हिडिओ सुरू करूयात. अर्ज करण्यासाठी या वेबसाईटवर यायचं आहे. वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. इथे येऊन “वैयक्तिक शेतकरी” हा पर्याय निवडायचा आहे आणि शेतकरी आयडी म्हणजे फार्मर आयडी इथे या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि “ओटीपी पाठवा” वर क्लिक करायचं आहे.
Mahadbt Trocter Yojana Online Aplication
फार्मर आयडी तुम्हाला माहित नसेल तर खाली ऑप्शन दिलेला आहे, लाल रंगामध्ये. तिथे जाऊन तुम्ही फार्मर आयडी चेक करू शकता. फार्मर आयडी टाकल्यानंतर ओटीपी येईल. जो काही मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर ओटीपी येईल. तो ओटीपी टाकून “ओटीपी तपासा” या बटणावर क्लिक करायचं आहे.
जसा तुम्ही “ओटीपी तपासा” वर क्लिक कराल, तर पुढे येईल की तुमची प्रोफाईल पूर्ण आहे का नाही. जर पूर्ण नसेल तर प्रोफाईल पूर्ण करावी लागेल. इथे आपली प्रोफाईल पूर्ण आहे 100%, त्यामुळे आपण अर्ज करू शकतो.

अर्ज करण्यासाठी “घटकासाठी अर्ज करा” हा डाव्या साईडला पहिला-दुसरा ऑप्शन आहे. त्यावर क्लिक करायचं आहे. त्या नंतर आपल्याला “कृषी यांत्रिकीकरण” आणि “बाबी निवडा” हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करायचं आहे.
“बाबी निवडा” वर क्लिक केल्यानंतर आपल्याला मुख्य घटक विचारला जाईल. ज्यामध्ये “कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसाहाय्य” – जो पहिला ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करायचं आहे.
त्यानंतर “तपशील” हा पर्याय दिसेल, त्यानंतर “व्हील ड्राईव्ह” प्रकार दिसेल आणि “एचपी” दिसेल – हे तीन ऑप्शन आपल्याला निवडायचे आहेत. पहिला आहे तपशील – तपशीलामध्ये आपण ट्रॅक्टरसाठी अर्ज करत असल्यामुळे “ट्रॅक्टर” हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर “व्हील ड्राईव्ह प्रकार” निवडायचा आहे, ज्यामध्ये 2WD, 4WD हे प्रकार असतात. एखाद्या अनुभवी शेतकऱ्याला तुम्ही विचारू शकता की 2WD काय असतं, 4WD काय असतो. जो प्रकार हवा आहे, तो तुम्ही निवडू शकता.
त्यानंतर HP ची श्रेणी निवडायची – ज्यामध्ये 31 ते 40 HP, 41 ते 70 HP आणि 60 ते 30 HP असे पर्याय असतील. यापैकी जो HP चा ट्रॅक्टर हवा आहे तो तुम्ही सिलेक्ट करू शकता. एखाद्या अनुभवी व्यक्तीला विचारून हे ठरवा.
त्यानंतर “पूर्वसमती कृषी यंत्रे” या बॉक्सवर टिक करायची आहे आणि “जतन करा” या पर्यायावर क्लिक करायचं आहे. अर्ज आपला इथे समाविष्ट झालेला आहे. खाली तुम्हाला दिसेल की ट्रॅक्टरसाठी अर्ज ऍड करण्यात आलेला आहे.
ही माहिती झाल्यानंतर आपल्याला डाव्या बाजूला पुन्हा “घटकासाठी अर्ज करा” या पर्यायामध्ये यायचं आहे. वरती “बाबी निवडा – अर्ज सादर करा” या पर्यायावर क्लिक करायचं आहे. “अर्ज सादर करा” वर क्लिक केल्यानंतर OK करायचं आहे.
इथे “पहा” बटन दिसेल – त्या बटनावर क्लिक केल्यावर जे काही आपण अर्ज केला आहे, तो इथे दाखवला जाईल. या अर्जाला अटी व शर्ती मान्य आहेत असं इथे सांगितलेलं असेल. या योजनेअंतर्गत बाबीसाठी आपली निवड होईल, त्यासाठी अटी शर्ती आणि मार्गदर्शक सूचना लागू असतील. मग “पहा” वर क्लिक करून टिक करायची आणि “अर्ज सादर करा” बटणावर क्लिक करायचं. यानंतर अर्ज यशस्वीरीत्या सादर झालेला आहे हे दाखवेल.
“लागू केलेले घटक” या पर्यायामध्ये जाऊन “घटक इतिहास पाहा” मध्ये क्लिक करा. इथे पाहा, ट्रॅक्टरसाठी आपला अर्ज झालेला आहे. “वेटिंग लिस्ट” सुद्धा दिसेल – म्हणजे अजून नंबर लागलेला नाही. नंबर लागला की इथे दाखवला जाईल.
“पावती पहा” वर क्लिक करून तुम्ही अर्जाची पावती सुद्धा काढू शकता. अशा पद्धतीने तुम्ही मोबाईल, लॅपटॉप किंवा पीसी मधून अर्ज करू शकता.