कोणत्या पिकासाठी किती हफ्ता भरवा लागेल Kharip Pik vima 2025 Apply Online

शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने खरीप 2025 पासून प्रधानमंत्री पीक विमा योजनेत महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. कोणत्या पिकासाठी किती हफ्ता भरवा लागेल Kharip Pik vima 2025 Apply Online आतापर्यंत अवघ्या एका रुपयात शेतकऱ्यांना मिळणारी पीक विमा योजना आता बंद करण्यात आली आहे. नव्या योजनेनुसार शेतकऱ्यांना आता विम्यासाठी संरक्षित रकमेच्या टक्केवारीनुसार हप्ता भरावा लागणार आहे. ही रक्कम वेगवेगळ्या पिकांसाठी वेगवेगळी असून, काही पिकांसाठी ती 2% आहे तर काहींसाठी 5% पर्यंत आहे.

या नव्या योजनेमध्ये आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे वैयक्तिक शेतात नुकसान झाल्यास शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळणार नाही. पीक विमा फक्त महसूल मंडळाच्या पातळीवर जोखीम व उत्पादन घट झाली असल्यास दिला जाणार आहे. म्हणजेच, तुमच्या शेतात नुकसान झाले असले तरी जर संपूर्ण महसूल मंडळात सरासरी उत्पादन घटले नसेल, तर विमा रक्कम मिळणार नाही.

Pik vima योजनेच्या अटींमध्ये आणखी एक महत्त्वाची अट म्हणजे ई-पीक पाहणी बंधनकारक करण्यात आली आहे. शेतकरी बांधवांनी त्यांच्या प्रत्यक्ष पीकांची माहिती ई-पीक पाहणी प्रणालीत भरली पाहिजे. जर ही माहिती चुकीची किंवा चुकीच्या वेळेस दिली गेली, तर त्याचा थेट परिणाम विमा भरपाईवर होईल.

नुकसान भरपाईची गणना ‘उंबरठा उत्पन्न’ या निकषावर आधारित केली जाणार आहे. मागील सात वर्षातील उत्पादनाचा विचार करून ज्या पाच वर्षांत सर्वाधिक उत्पादन झाले होते त्यांची सरासरी काढून उंबरठा उत्पन्न ठरवले जाते. जर त्याच्याखाली उत्पादन झाले, तरच विमा रक्कम दिली जाते. हे गणित जरा गुंतागुंतीचं असलं तरी यामध्ये शेतकऱ्यांच्या हातात फार काही राहत नाही, कारण उत्पादनाचा दर्जा वा हवामान यावर नियंत्रण राहात नाही.

योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना फार्मर आयडी घेणं आवश्यक आहे आणि ही नोंदणी ‘AgriStack Farmer id ’ प्रणालीद्वारे व्हायला हवी. योजनेत सामील होण्यासाठी शेतकऱ्यांना 31 जुलै 2025 ही शेवटची तारीख देण्यात आलेली आहे. रब्बी हंगामासाठी ही अंतिम तारीख 30 नोव्हेंबर असून, कांदा वगैरे पिकांसाठी 15 डिसेंबर 2025 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. उन्हाळी पिकांसाठी 31 मार्च 2026 ही शेवटची तारीख आहे.

वेगवेगळ्या पिकांसाठी भरावयाच्या हप्त्यांची रक्कमही या योजनेत स्पष्ट दिली आहे. उदाहरणार्थ, भात पिकासाठी शेतकऱ्याला प्रति हेक्टर 152 रुपये भरावे लागतील. सोयाबीनसाठी 160 रुपये, भुईमूगसाठी 112 रुपये, तुरीसाठी 940 रुपये, तर कापूस पिकासाठी काही जिल्ह्यांमध्ये 900 रुपये ते 1800 रुपये इतका हप्ता भरावा लागेल. ही रक्कम प्रत्येक जिल्ह्यानुसार थोडीफार बदलते. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यानुसार शासनाचा अधिकृत GR वाचणे अत्यंत गरजेचे आहे.

ई-पीक पाहणी बंधनकारक

  • प्रत्यक्ष शेतातील पिकाची नोंद ऑनलाइन करावी लागणार
पीकहप्ता रक्कम (रु.)
भात (तांदूळ)152
बाजरी640
भुईमूग112
सोयाबीन160
मूग515
तूर940
उडीद500
मका360
कांदा510
कापूसजिल्ह्यानुसार वेगळे (उदा. 900 ते 1800 रु.)
हंगामअंतिम तारीख
खरीप31 जुलै 2025
रब्बी30 नोव्हेंबर 2025
कांदा, गहू15 डिसेंबर 2025
उन्हाळी पिके31 मार्च 2026

शेतकऱ्यांनी लक्षात ठेवाव्या गोष्टी

  • फार्मर आयडी (AgriStack) आवश्यक.
  • ई-पीक पाहणी नोंद केल्याशिवाय विमा दावा मिळणार नाही.
  • पीक बदल किंवा तक्रारी वेळेत नोंदवाव्यात.

संपूर्ण कोणत्या पिकासाठी किती हफ्ता भरवा लागेल Kharip Pik vima 2025 Apply Online योजना व तिचे धोरण पाहता, शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही योजना कितपत फायदेशीर ठरेल हे भविष्यात स्पष्ट होईल. मात्र सद्य परिस्थितीत विमा कंपन्यांना याचा सर्वाधिक फायदा होईल, अशी शंका अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. विमा मिळवण्याची प्रक्रिया अधिकाधिक किचकट व नियंत्रणात ठेवण्यात आली आहे.

शेतकरी मित्रांनो, अशा या नवीन योजनेत सहभागी होण्यासाठी वेळेत नोंदणी करा, ई-पीक पाहणी वेळेवर पूर्ण करा आणि तुमच्या पिकांबाबत योग्य ती माहिती भरून विम्यासाठी पात्र ठरवा. विमा भरपाई मिळवण्यासाठी सगळी प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडणे हीच काळाची गरज आहे.

Leave a Comment