Mahatma Phule jan Arogya Yojana 2025 : जाणून घ्या प्रक्रिया आणि योजनेसाठी लागणारे डॉक्युमेंट पात्रता निकष

शेतकरी मित्रांनो आपण आपल्या आरोग्याशी निगडित एक महत्त्वाची योजना बघणार आहोत या योजनेचे नाव महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना असे आहे महाराष्ट्र सरकार जनतेसाठी विविध प्रकारच्या योजना आणत असते त्यात महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही महाराष्ट्र शासनाची एक अत्यंत महत्वपूर्ण आरोग्य योजना आहे आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणारे व अत्यंत गरीब
सर्वसामान्य लोकांना मदत करणारी आहे

महात्मा फुले जन आरोग्य योजना नाव नोंदणी नेमकी काय आहे त्याचे ला पात्रता काय आहे

या योजनेत नाव नोंदणी कशा प्रकारे केली जाते हे सर्व आज आपण या लेखच्या माध्यमातून बघणार आहोत महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना म्हणजे काय महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना नाव नोंदणी काय आहे याची माहिती खाली दिलेली आहे

📌 उद्देश आणि लक्ष

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही एक योजना काढण्याचे महत्त्व म्हणजेच की आर्थिक स्थिती कमी असलेल्या लोकांना चांगली आणि मोफत वैद्यकीय सेवा देणे जेणेकरून ते आपले आरोग्य सुधारू शकतील सुरुवातीला महाराष्ट्र सरकारने जीवनदायी ही योजना सुरू केली त्यात त्यांनी फक्त गंभीर आजारावर खर्च देण्याचा दावा केला होता पण योजनेत बदल करून त्यांना राजीव गांधी जीवनदायी योजना या नावाने ओळखली जाऊ लागली 2/ जुलाई /2012 रोजी पासून ही योजना आठ जिल्ह्यांमध्ये लागू करण्यात आली होती

योजनेअंतर्गत मुंबई ठाणे धुळे नांदेड अमरावती सोलापूर गडचिरोली  रायगड हे जिल्हे समाविष्ट होते या योजनेमध्ये बदल करून 1971 प्रकारच्या विविध शास्त्र प्रक्रिया व थेरपी यांचा समावेश केला जातो या योजनेत यश मिळणार यानंतर महाराष्ट्र सरकारने ही योजना संपूर्ण राज्यात म्हणजेच 35 जिल्ह्यांमध्ये राबवण्याची घोषणा केली त्यानंतर 1/ एप्रिल 2017 पासून राजीव गांधी जीवनदायी योजनेचे नाव बदलून महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना सुरू ठेवण्याचा सरकारची सरकारने घोषणा केली होती या ही

https://mahakranti.com/ladki-bahin-yojana2025/

योजनेत सुरळीत चालावी म्हणून सरकारने  कॅल्लिंग ची सुविधा उपलब्ध केली नागरिकांसाठी 24 तास सेवा ठेवली गेली आजारी व्यक्ती हॉस्पिटलमध्ये उपचार घेताना हॉस्पिटलमधून घरी जाताना तसेच रोगाबद्दल नंतर डॉक्टरचा सल्ला घेण्यासाठी या योजनेचा उपयोग करता येत आहे या योजनेत आजाराच्या उपचारासाठी कुटुंबातील लोकांसाठी वार्षिक विमा संरक्षण देण्यात आले आहे 23 डिसेंबर 2018 पासून आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही भारत सरकारची विमा योजना आहे

तर साधी योजना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना हिच्यासोबत हे सुरू करण्यात आली आहे पूर्वी या योजनेअंतर्गत त्याला वार्षिक 1.50 लाख रुपयांचा विमा मिळत होता नंतर तो वाढवून 2 लाख रुपये करण्यात आला होता किडनी ट्रान्सप्लांट साठी 2.5 लाख रुपये होते तर ते वाढवून तीन लाख करण्यात आले आता नुकतेच सरकारने या योजनेत बदल करून राज्यातील सर्व रेशनकार्डधारक व डॉमिसिले मेसेज असणाऱ्या सर्व व्यक्तींना ही योजना लागू होणार आहेच राज्यातील सर्वच नागरिकांना एक आरोग्य कवच प्राप्त होणार आहे योजनेअंतर्गत कुटुंबाला वार्षिक 1.5 लाख रुपयांचा विमा मिळत होता तर पाच लाख रुपये करण्यात आला आहे हा निर्णय 28 जून 2013 रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत लाभ

महाराष्ट्र राज्यात या योजनेत येण्यापूर्वी केशरी कार्ड व आत्यादायी शोधा पत्रिका असणाऱ्या नागरिकांचा या योजनेचा लाभ घेता येत होता मात्र यापुढे राज्यातील नागरिकांना एक आरोग्य संरक्षणाचे कवच प्राप्त होणार आहे त्यात महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना

(mahatma phule jan arogya yojana hospital list pune) या योजनेचे एकत्रीकरण करून काही बदल करून योजनेमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत संरक्षण प्रत्येक कुटुंबात दर वर्षी पाच लाख रुपये देण्यात येणार आहे तसेच आता महात्मा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत आरोग्य संरक्षण प्रत्येक कुटुंब दरवर्षी पाच लाख रुपये एवढे करण्यात आले आहे किडनी शस्त्रक्रिया महात्मा फुले जन आरोग्य योजनेत उपचारादरम्यान खर्च प्रत्येक रुग्णाला 2.5 लाख एवढे आहेत ते आता 4.5 लाख रुपये एवढे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत ✅ पात्रता

  • आर्थिक दृष्ट्या कमजोर असलेल्या गरीब कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न एक लाख रूपये पेक्षा कमी असावे
  • अर्जदार हा मूळ महाराष्ट्राचा रहिवासी असावा
  • महाराष्ट्र राज्यातील संकटग्रस्त असलेले कुटुंब व त्यातील सदस्य या योजनेत प्राप्त आहे

📄 महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने ला लागणारे डॉक्युमेंट

  1. मतदान कार्ड
  2. पॅन कार्ड
  3. आधार कार्ड
  4. बँकेचे पासबुक
  5. रेशन कार्ड
  6. मेडिकल सर्टिफिकेट
  7. उत्पन्नाचा दाखला
  8. वाहन चालक परवाना
  9. पासपोर्ट आकाराचा फोटो
  10. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला पांढरा शिधापत्रिका आणि सातबारा उतारा
  11. आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना सरकारने निर्धारित केलेले ओळख पत्र

🖥️ महात्मा फुले जन आरोग्य योजनेत नाव नोंदणी कशी करावे

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने अंतर्गत लाभ घेण्याकरिता हॉस्पिटल मध्ये आरोग्य मित्र असतात हॉस्पिटल मध्ये उपचार करताना ते मदतही करतात या योजनेत लाभ घेण्यासाठी  या वेबसाईटवर https://www.jeevandayee.gov.in/जाऊन नाव नोंदणी करावी लागते

☎️ महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना हेल्पलाइन नंबर-mahatma phule jan arogya yojana toll free number

या लेख मध्ये तुम्हाला महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना योजनेचे   सर्व माहिती दिली गेली आहे जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर तुम्ही खालील नंबर वर संपर्क करा
15 53 88
1800 233 2200

Leave a Comment